वाहत्या ड्रेनेजला आस्तिक कुमार पांडे चे नाव ; रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; शहरातील नागरी समस्यांवर रिपब्लिकन सेनेचा हल्लाबोल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 31 January 2022

वाहत्या ड्रेनेजला आस्तिक कुमार पांडे चे नाव ; रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; शहरातील नागरी समस्यांवर रिपब्लिकन सेनेचा हल्लाबोल

औरंगाबाद : शहरातील सर्व स्लम वार्डातील वारंवार फुटणारे ड्रेनेज लाईन बदलून नविन टाकण्यात यावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे आज दिनांक 31/01/2022 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने  मिलिंद बनसोडे  (शहर अध्यक्ष )ह्यांच्या नेतृत्वाखाली, औरंगाबाद शहराचे महानगर पालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांचे नावाने स्लम वार्डातील फुटलेले ड्रेनेज लाईन व खड्डे असलेल्या रस्त्यांना नाव देऊन नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. 


याप्रसंगी रिपब्लिकन सेना चे मा.चंद्रकांत रुपेकर ( मराठवाडा उपाध्यक्ष), मा.आनंद कस्तुरे ( मराठवाडा संघटक), मा.काकासाहेब गायकवाड ( जिल्हा अध्यक्ष पश्चिम), मा. सिध्दोधन मोरे ( जिल्हा अध्यक्ष पुर्व ), मा. सचिन निकम ( रिपब्लिकन विद्यार्थी सेना मराठवाडा अध्यक्ष), सौ. मनिषाताई  साळुंखे ( महिला जिल्हा अध्यक्ष पश्चिम), मा.राहुल कानडे ( युवा जिल्हा अध्यक्ष पश्चिम), मा.बबन साठे ( जिल्हा उपाध्यक्ष पश्चिम), मा.विकास हिवराळे ( जिल्हा उपाध्यक्ष पुर्व), मा. रामराव नरवडे ( जिल्हा सचिव पुर्व), मा. विलास गायकवाड ( जिल्हा उपाध्यक्ष पुर्व),  मा.धम्मा भुजबळ ( शहर अध्यक्ष पुर्व), ॲड.अतुल कांबळे ( रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष), मा. सचिन शिंगाडे ( जिल्हा उपाध्यक्ष पुर्व), मा. अक्सर भाई ( शहर सचिव पुर्व), शालिनीताई बनसोडे, सुनीताताई बनसोडे, सुमणबाई बनसोडे,मिनाताई दाणे, प्रमिलाताई जाधव, सुखदानबाई, पट्टेकर बाई, बिरारे बाई, पवार बाई, सुजाताताई तुपे, मा.अजय बनसोडे,शेषराव दाणे, मा.राजाबाबु बनसोडे, मा.विजेंद्र बनसोडे, मा.कुणाल तुपे, मा.नरेंद्र बनसोडे,प्रशांत सुखधान, गौरव नागुला अक्षय दाणे आदि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages