पीएचडी, एम.फिल बाबतीच्या विविध मागण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन दिले प्र.कुलगुरूंना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 28 January 2022

पीएचडी, एम.फिल बाबतीच्या विविध मागण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन दिले प्र.कुलगुरूंना निवेदन

औरंगाबाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठने २०२२ साली सेट परीक्षेची जाहिरात जाहीर केली होती. त्यानंतर ती परीक्षा घेण्यात आली. दरम्यान अनेक विद्यार्थी पेट पासून वंचित राहिले आहे. ज्या विषयांची पेट परीक्षा घेण्यात याव्या आणि जे विद्यार्थी विद्यापीठात वेगवेगळ्या विभागात एम.फिल करतात त्या विद्यार्थ्यांना समितीच्या सदस्याद्व्यारे पीएच. डीला प्रवेश देण्यात यावा. यातील अनेक एम.फिलचे विद्यार्थी पेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांचे प्रश्न तात्काळ मान्य करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनकडून तर्फे निवेदना मधून करण्यात आले.


सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे या निवेदनात करण्यात आल्या. 

१.ज्या विषयाच्या पेट परीक्षा झालेल्या नाहीत त्या तात्काळ घेण्यात याव्यात.

२. अधिछात्रवृतिधाक एम.फिल विद्यार्थ्यांना पीएच.डी प्रवेश देण्यात यावी.

३. जे विद्यार्थी शैक्षणिक २०२२-२१ या वर्षात एम.फिल प्रवेशित आहेत. त्यांना नेट परिक्षाची अट न घालता पुढील भागात थेट त्रि. सदस्यीय समिती मार्फत पीएच. डी प्रवेश देण्यात यावे. 

४. DRC समित्यांची निवड करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या सर्व मागण्यांना गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांचे हिंताचे निर्णय घेण्यात यावे. अन्यथा आंदोलनाचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी दिला.


 प्रा.  प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल दिपके, प्रताप मोरे, हर्षपाल खाडे,सोनाजी गवई,अनिल खंदारे, दिग्विजय शिंदे,वाल्मीक वाघ,संतोष अंभोरे,अमोल घुगे, मनिष इंगळे, रविंद्र गवई, गोलू गवई इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages