दिव्यांगांना विविध योजनांना लाभ मिळावा यासाठी तहसिलदानां निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 25 January 2022

दिव्यांगांना विविध योजनांना लाभ मिळावा यासाठी तहसिलदानां निवेदन

जयवर्धन भोसीकर

बिलोली :

तालुक्यातील दिव्यांग बांधवाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती बिलोली संघटना तसेच नांदेड जिल्हा दिव्यांग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दिनांक 25 जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव न्याय हक्कासाठी ढोल बजाव मोर्चा घेवून तहसिल कार्यालयावर धडकले.


बिलोली तहसिलचे तहसिलदार श्रीकांत निळे यांना प्रहार जनशक्संती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती बिलोली संघटना तसेच नांदेड जिल्हा समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. यात शासन निर्णयानुसार विविध योजनेचा लाभ दिव्यांगांना तत्काळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यात ५ % निधी, घरपट्टी व पाणीपट्टी सुट मिळावी; अंत्योदय योजनेचा लाभ ३५ किलो अन्न धान्य २ रू प्रति किलो प्रमाणे व विनाअट घरकुल योजनेचा लाभ तात्काळ मिळावा या मागण्यांचा समावेश आहे.


यावेळी निवेदन देतांना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष हनमंत सिताफुले, तालुका महिला अध्यक्षा सौ.आशाताई संजय रेड्डी,उपाध्यक्ष शंकरभाऊ आचेवाड,संघटक शांताताई चिंतले,उत्तर नांदेड जिल्हा प्रमुख प्रहार दिव्यांग क्रांती संघटना विठ्ठलराव मंगनाळे,दक्षिण जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर,जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख,जिल्हा प्रमुख श्रीराम पा.आलुवडगांवकर,जनशक्ती पक्ष जिल्हा संपर्क प्रमुख गणेश पा.हांडे,व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते. बिलोली शहरातील दिव्यांग बांधवांनी तहसिल मध्ये निराधार व श्रावण बाळ योजनेत आपले फार्म भरून द्यावे व पंचायत समिती तसेच नगर परिषद मध्ये जाऊन नोंदणी करावी व योग्य योजनाचा लाभ घ्यावा अशी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आवाहन करणायत आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages