जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार:प्रशासक दोन महिने राहणार - आयुक्त यु.पी.एस.मदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 3 February 2022

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार:प्रशासक दोन महिने राहणार - आयुक्त यु.पी.एस.मदान

पुणे: विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी यांचा कार्यकाळ 21 मार्च रोजी संपुष्टात येणार असून गट व गणांची पुनर्रचना अद्याप झालेली नाही.ही पुनर्रचना झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.त्यामुळे 21 मार्च नंतर किमान दोन महिने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक लागू शकते असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी कळविले.


मागच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निवड ही 21 मार्च रोजी झाली होती. आचारसंहिता कधी लागणार याकडे लक्ष लागले होते.यातच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या या विषयावर पदाधिकारीसोबत बैठक झाली.यामध्ये निवडणुकीबाबत चर्चा झाली. 73 व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांची पंचवार्षिक निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेणे नियमानुसार असते. मात्र गट व गणाचे आरक्षण हे निवडणुकीपूर्वी किमान तीन ते चार महिने तसेच अध्यक्ष आरक्षण पडत असते.मात्र यावेळी राज्य सरकारने गट व गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला या संस्थाच्या निवडणुकीची पूर्वतयारी करता आली नाही.गट व गणांची संख्या संख्या वाढविण्याबाबत झालेल्या कायधात रूपांतर झाल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.विद्यमान पदाधिकारी कार्यकाळ 21 मार्च असून त्यानंतर प्रशासक लागू पडणार आहे.असे मदान यांनी सांगितले.



1 comment:

  1. 1xbet korean - LegalBet.co.kr
    1xbet korean - Licensed online betting site ⚡ All sports - Horse Racing & Football ✓ 1xbet mobi Live streaming ✓ Live stream available.

    ReplyDelete

Pages