जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे विशेष मुलाखतींचे प्रसारण ;डॉ. पारस मंडलेचा यांची आकाशवाणीवर मुलाखत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 March 2022

जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे विशेष मुलाखतींचे प्रसारण ;डॉ. पारस मंडलेचा यांची आकाशवाणीवर मुलाखत

औरंगाबाद, दिनांक 14 : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि विद्यमान शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणीवर विशेष मुलाखतींचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मुलाखतींचे प्रसारण 15 मार्चपासून आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून सकाळी 7.45 वाजता होणार आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी मुलाखतीमध्ये कोविड काळातील आरोग्य यंत्रणेचे कामकाज, कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, लसीकरण वाढविण्यासाठी राबविण्यात आलेले विशेष उपक्रम व अभियान तसेच कोविडच्या तीनही लाटेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबत या मुलाखतीत  सविस्तर माहिती दिली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग  15 मार्च रोजी औरंगाबाद आकाशवाणीच्या 101.7 मेगाहर्टझ्वरून सकाळी 7.45 वा. प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी घेतली आहे.


No comments:

Post a Comment

Pages