आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 15 July 2022

आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

औरंगाबाद : आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने उद्या शनिवार दि.१६ जुलै रोजी आंबेडकर संशोधन केंद्र येथे दुपारी १:३० वाजता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये वैचारीक प्रबोधन झाले पाहिजे ह्या हेतूने आंबेडकरी चळवळीच्या शत्रूशी आपण कसा प्रतिकार करायचा ह्या बाबत प्रशिक्षक मार्गदर्शन करतील.

तर पोलीस अधीक्षक मा.निकेश खाटमोडे पाटील हे ह्या शिबीराचे उदघाटन करतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावण गायकवाड असणार आहे.


 प्रशिक्षक बी बी मेश्राम,अंबादास रगडे,शेखर मगर,एस.रोडगे,सिद्धार्थ शिनगारे हे मार्गदर्शन करतील.

तरी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ह्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहावे असे आवाहन आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment

Pages