आयटीआयमध्ये अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींसाठी विविध ट्रेडसाठी राखीव जागा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 8 July 2022

आयटीआयमध्ये अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींसाठी विविध ट्रेडसाठी राखीव जागा

नांदेड  दि. 8 :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अल्पसंख्याक समाजासाठी विविध ट्रेडच्या राखीव जागा उपलब्ध आहेत. अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनी या राखीव ट्रेडसाठी प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. बिरादार यांनी  केले आहे. 


सन 2022 साठी आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 20 ट्रेडसाठी जवळपास 724 जागा  उपलब्ध आहेत. त्यापैकी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ट्रेडसाठी उपलब्ध आहेत. फक्त अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना यात प्रवेश घेता येईल. ड्रासमन सिव्हिल-24, फिटर-24, मेसन -24, ट्रॅक्टर मेकॅनिक -20, टुल ॲन्ड डायमेकर-24 या ट्रेडसाठी अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा, असेही आवाहन संस्थेचे प्राचार्य  यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages