समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा मानाचा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 11 July 2022

समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा मानाचा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान.

मुंबई:

 समाज कल्याण विभागाचे आयुक्त,डाॅ प्रशांत नारनवरे यांच्या प्रशासकीय कार्याची दखल घेण्यात आली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयुक्त यांचा महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.राज्यात समाज कल्याण विभागात  राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच त्यांचे लोकाभिमुख प्रशासकीय कामकाजामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 77 व्या वर्धापन दिनाचे औचित्य निमित्ताने  दिनांक ८ जुलै २०२२ रोजी  आयोजित कार्यक्रमात गौरव केला आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटी च्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा "भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर  पुरस्काराने यावेळी महामहिम श्री.भगतसिंह कोश्यारी , महाराष्ट्र राज्य ,यांच्या हस्ते डॉ. प्रशांत नारनवरे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दीक्षांत सभागृह ,मुंबई विद्यापीठ ,फोर्ट मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले , मा.आमदार श्री प्रविण दरेकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. प्रशांत नारनवरे यांनी समाज कल्याण विभागात आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबरोबरच प्रशासकीय गतिमानता निर्माण केले आहे.

विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढले आहेत.

विभागास गेल्या दोन वर्षात प्राप्त झालेल्या निधी देखील जवळपास 100% खर्च करण्यात आला आहे. राज्यात अनुसूचित जाती व बौद्ध घटकातील लाभार्थ्यांच्या अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचे देखील यशस्वी नियोजन त्यांच्या कार्यकाळात झाले आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात देखील पुढाकार प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढून  केंद्र शासनाकडून निधी मंजूर करून घेतला आहे. परदेशी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची  प्रक्रिया अतिशय सुलभ केले आहे. कर्मचारी यांचे पदोन्नतीचे असलेले अनेक वर्षाचे प्रश्न निकाली काढला आहे. त्यातून शेकडो कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाले आहे. विभागातील योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी 54 योजनांच्या मार्गदर्शिका तयार केल्या आहेत, तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी देखील पुढाकार घेत त्यांच्यासाठी च्या योजनांची  प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत मनी मार्जिन या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ राज्यातील नवं उद्योजकांना दिला आहे, कार्यरत असलेल्या काही योजनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे, निवासी शाळा मध्ये सीबीएससी अभ्यासक्रम राबविण्याचा साठी पुढाकार घेतला आहे, तसेच गेल्या दोन वर्षात निवासी शाळांचा १००% टक्के निकाल आहे,

विविध योजनांचा सामूहिक लाभ देण्यासाठी क्लस्टर हब निर्माण करण्यात येत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या ऐतिहासिक स्थळांच्या देखील विकास करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे, यासह समाज कल्याण विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा धडाका त्यांनी लावला आहे. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचा समाज कल्याण विभागात "नारनवरे पॅटर्न" म्हणून चर्चेचा विषय बनला आहे. याच त्यांच्या उल्लेखनीय कामकाजा व प्रशासकीय गतिमान कार्याची नोंद सदर संस्थेने घेऊन त्यांना सन्मानित केले आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे यांचे सन्मानित केल्याबद्दल समाज कल्याण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages