सर्वत्र पावसाने जिल्ह्याच्या 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 13 July 2022

सर्वत्र पावसाने जिल्ह्याच्या 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर

नांदेड,  दि. 13 :- नांदेड जिल्ह्यात व इतरत्र गत तीन दिवसांपासून असलेल्या पावसामुळे लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील देगलूर, भोकर, लोहा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेले सुमारे 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाली आहे. सर्व संबंधितांना पूर परिस्थितीबाबत दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

 

या 34 प्रकल्पांमध्ये देगलूर तालुक्यातील भूतनी हिप्परगा ल.पा. येडूर साठवण तलाव, हानेगाव एक व हानेगाव दोन ल.पा. अंबुलगा ल.पा., मुखेड तालुक्यातील शिरुळ ल.पा. मुखेड ल.पा. सोनपेठवाडी ल.पा. कुंदराळा मध्यम प्रकल्प, बिलोली तालुक्यात दर्यापूर ल.पा., लोहा तालुक्यात सुनेगाव, भोकर तालुक्यात लामकानी ल.पा., धानोरा ल.पा., सावरगाव ल.पा., कोंडदेव ल.पा.,उमरी तालुक्यातील कुदळा मध्यम प्रकल्प, कारला, गोरठा, सोमठाना ल.पा., हदगाव तालुक्यातील चाभरा ल.पा., पिंपराळा, केदारनाथ, घोगरी, येवली, चिकाळा, धनिकवाडी, लोहामांडवा ल.पा. समावेश आहे. हिमायतनगर तालुक्यात सुना, पवना ल.पा.,कंधार तालुक्यात पानशेवडी ल.पा., घागरदरा, भेंडीवाडी सा.त. पेठवडज मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.


No comments:

Post a Comment

Pages