औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाणे पैठण पोलीसांनी अपहरणाचा सहा तासात छडा लावून तीन आरोपीना केले जेरबंद ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 August 2022

औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाणे पैठण पोलीसांनी अपहरणाचा सहा तासात छडा लावून तीन आरोपीना केले जेरबंद !

औरंगाबाद: 

दिनांक 3/८/२२ रोजी महिला नामे कविता दिलीप चव्हाण रा बोकूड जळगाव तांडा ता. पैठण यांनी पोलीस ठाणे पैठण येथे येऊन माहिती  दिली की,माझे पती दिलीप जानू चव्हाण हे शेती नावावर करण्यासाठी निबांधक कार्यालय पैठण येथे  दुपारी १.३० वाजेच्या सुमारास गेलले असताना गावातील कृष्णा तरमळे व आणखी दोन अनोळखी इसम हे काळ्या रंगाची ब्रेझा कार मध्ये बळजबरीने टाकून घेऊन गेले असल्याचे सांगितले त्यावरून पोलीस ठाणे पैठण येथे गु र क्र. २७९/२०२२ कलम ३६३,३४ भा. दं. वि. प्रमाणे  गुन्हा दाखल केला करण्यात आला. 

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधिक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांचे मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रंगे (स्था.गु.शा) पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस ठाणे पैठण यांनी तात्काळ आरोपी शोध कमी पथक तयार करून गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या मागावर पथक पुणे येथील रांजणगाव येथे आरोपी शोधकामी गेले. तेथील हॉटेल्स, लॉज यांची तपासणी करताना वेशांतर करून रांजणगाव गणपती हे गाव तीर्थस्थान असल्याने भाविकांचे वेश परिधान करून केले. त्यानंतर आरोपी हे एका हॉटेल मध्ये दबा धरून बसल्याचे पथकाला माहिती मिळाल्याने त्यांनी हॉटेल चे मुख्य प्रवेशद्वार बंद करून हॉटेलची पाहणी केली असता तिथून अपहरणकर्ते यांचा सहा तासामध्ये  शोध घेऊन अपहारीत झालेली व्यक्ती दिलीप जानू चव्हाण यास सुखरूप सोडवून गुन्हयातील तीन आरोपी नामे १) मारोती मुरलीधर नागे २) रामनाथ मुरलीधर कोल्हे ३) दिनेश प्रमोद राठोड तीन्ही राहणार बोकुड जळगाव तांडा ता. पैठण जि.औरंगाबाद याना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी हि मा. पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांचे मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रंगे (स्था.गु.शा)  पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस ठाणे पैठण पोउपनि सतीष भोसले पोहेकॉ महेश माळी, पोलीस अमलदार संतोष खिळे, संतोष चव्हाण, योगेश तरमळे चालक पोहेकॉ भाऊसाहेब तांबे यांनी पार पाडली.

No comments:

Post a Comment

Pages