औरंगाबाद:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे वतीने मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक सा. डॉ. पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन समृध्दी महामार्ग, सार्वगी टोलनाका जवळ १० किमी मॅरेथॉन २०२२ स्पर्धा अत्यंत उत्साहत पार पाडली. यावेळी समृद्धी महामार्गावर जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झालेले बघायला मिळाले, समृद्धी महामार्ग वर पहिल्यादांच आयोजित या मॅरेथॉन मध्ये सर्व साधारण गटात 1750 स्पर्धेक ज्यात तरुण - तरुणी, माध्यम प्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, महिला तसेच 9०० पोलीस व होमगार्ड असे एकूण २६५० स्पर्धकांनी उत्स्फूर्तपने सहभाग नोंदविला आहे.
मा. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे सह मा. सुनिल चव्हाण जिल्हाधिकारी , औरंगाबाद, जी. श्रीकांत जॉइंट कमिशनर जी एस टी मा. निलेश गटणे, सी.ई. ओ. जि.प. औरंगाबाद श्री. निर्मित गोयल, समादेशक, आय .आर. बी . मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, औरंगाबाद या मान्यवरांनी आज सकाळी ०७.०० वाजेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली.
या १० किमी मेंथॉन स्पर्धेतील विजया मध्ये
१) पुरुष गट पोलीस / होमगार्ड विभाग प्रथम कमांक :- किशोर विठ्ठल मरकड वेळ ३१.५२ मिनिटे द्वितीय क्रमांक प्रविण भाऊसाहेब सांगळे क ३८.२५ मिनिटे तृतीय क्रमांक : गुरुमुखसिंग फुलसिंग सुलाने वेळ ४०.३३ मिनिटे
२) महिला गट (पोलीस होमगार्ड विभाग प्रथम क्रमांक: पूजा तानाजी ढवळे ६०.२० मिनीटे द्वितीय
क्रमांक सुशिला रमेश पवार वेळ ६९.४८ मिनिट तृतीय क्रमांक मोहिनी चंद्रकांत लंबे वेळ ७२.०७ मिनिटे.
३) सर्वसाधारण ( पुरुष गट )
प्रथम क्रमांक : सिध्देश्वर आल्हट वेळ : ४२.८९ द्वितीय क्रमांक: कुलदिप चहाण वेळ ४३.२८ तृतीय क्रमांक धरम भवरे वेळ ४५.०० मिनिट
४)सर्वसाधारण (महिला गट )
प्रथम क्रमांक शितल सुपडू जाधव ५८.०६ द्वितीय क्रमांक बाबर परिमल बाळासाहेब वेळ ५९.४३ मिनिटे तृतीय क्रमांक सुहानी सुधीर खोब्रागडे वेळ ६१ .२० मिनीटे.
यातील सर्व गटातील प्रथम विजेत्यास स्पोर्ट सायकल, द्वितीय विजेत्यास ओव्हन, तर तृतीय विजेत्यास मिक्सर ग्राइंडर पारितोषिक म्हणून वरील नमूद मान्यवरांचे हस्ते देण्यात आले आहे. तसे सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या १० किमी मॅरेथॉन स्पर्धेस यशस्वीरीत्या आयोजित करण्या करिता औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलास व्हेरॉक कंपनी ग्रुप श्री. सतिष मांडे व राहुल टेकाळे, अलाना ग्रुप कंपनी दिपक कुमार मेहता, कैनरा बैंक पंकज गजभिये, कभी उत्तम एनर्जी विकास कांबळे, अजिंठा फार्मा लि. व्यापारी असोसीएशन चे पतन लोहिया स्वस्तिक एजन्सी राधेश्याम तोष्णीवाल, स्टिपिंग स्टोन स्कूल रजीत खान, उडरीच स्कूल रणजित खोडे, महिंद्रा सीआई ऑटोमोटीव्ह चे सुरेश चंद्राव सत्यनारायण दायमा, प्रदिप मानकापे, रायन इन्टरनेशनल स्कुल तसेच अजित मेटे, भगवान मते (कॉन्ट्रैक्टर) समृद्धि महामार्ग प्रशासन यांचे प्रायोजकत्व व सहकार्याने हि मेरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण झाली.
या स्पर्धेकरिता औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले त्या सर्वांचे मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment