माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत होणार प्रभाव या विषयावर कार्यशाळा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 September 2022

माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत होणार प्रभाव या विषयावर कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 30 :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात 2005 पासून लागू करण्‍यात आला. शासनाने वेळोवेळी जाणीवपुर्वक उचलेल्‍या पावलांमुळे अल्‍पावधीतच राज्‍यात हा कायदा लक्षणीय स्‍वरूपात लोकाभिमुख झाला.  माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार अधिनियम 2005 व  आरटीआय ऑनलाईन  व “माहिती व तंत्रज्ञानाचा-माहिती अधिकार कायदा अमंलबजावणीत होणारा प्रभाव ” या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 28 सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.


या प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, सहाय्यक जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी प्रदीप डुमणे, यशदाचे सेवानिवृत्‍त अॅड. भिमराव हाटकर आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रथम अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी हे सहभागी झाले होते.   


माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायदयाच्‍या व्‍यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अमंलबजावणीकरिता आरटीआय  प्रणालीचा वापर प्रशासनात कसा करावा  याविषयीची  माहिती उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना देण्‍यात आली आहे.  आरटीआय प्रणाली  जिल्‍हाधिकारी कार्यालय, महानगरपालीका, पोलीस अधिक्षक कार्यालय,   जिल्‍हा परिषद, या कार्यालयात कार्यान्‍वीत करण्‍यात आली आहे. ही सुविधा https://rtionline.maharashtra.gov.in संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. त्‍यानुसार नागरिकांनी  ऑनलाईन प्रणालीव्‍दारे  अर्ज व अपिल दाखल करू शकतात. तसेच   www.nanded.gov.in या वेबसाईटवर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्‍वये प्रत्‍येक कार्यालयनिहाय, सर्व कार्यासन प्रमुख,  , सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यांनी   1 ते 17 मुदयांची माहिती ही संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द केली आहे. त्‍यानुसार नागरिकास सदर माहिती सहज उपलब्‍ध होउ शकते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages