नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील - जिल्हाधिकारी अभिजित राऊत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 October 2022

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड  दि. 12  :- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र हा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी यासाठी आवश्यक असलेली माहिती दिलेल्या कालमर्यादेत विमा कंपनीला कळविणे अत्यावश्यक असून शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.   

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे नुकसानीचे निकष देण्यात आले आहेत. यात विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग, नैसर्गीक आपत्ती, पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर, पुराचे पाणी शेतात शिरुन दिर्घकाळ जलमय होणे, शेतात पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या पिकामध्ये कापणी पासून 14 दिवसापर्यंत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस इत्यादी कारणामुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान ग्राह्य धरल्या जाते.

 

सद्यस्थितीमध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी अधिसूचना काढलेली असताना देखील स्थानिक नैसर्गीक आपत्ती अंतर्गत व काढणी पश्चात नुकसान झाल्यास पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सदरील घटकाअंतर्गत नुकसान भरपाई मिळणार नाही याची सर्व शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी.

 

विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती/पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन  Crop-Insurance हे ॲप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 18002337414/ 02462 240577/ 02462 240578/ 02462 240579/ 02462 240580/ 02462 240581/ 02462 240582 /180042533333 किंवा ईमेल pmfbypune@uiic.co.in / 230600@uiic.co.in ) द्वारे नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी, कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages