नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 15 ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 October 2022

नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 15 ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धा

नांदेड  दि. 12  :-नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक युवकांनी  शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत नेहरू युवा केंद्र, राज निवास शिवराय नगर मालेगाव रोड, तरोडा खु.नांदेड येथे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.


स्पर्धा  15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 पासून नरहर कुरूदंकर सभागृह, पिपल्स महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रतापपाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


युवा उत्सवात चित्रकला स्पर्धा कविता लेखन, छायाचित्र स्पर्धा, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धक हा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असावा. त्याचे वय 1 एप्रिल रोजी  18 ते 29 वर्ष असावे. एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभाग घेता येईल.चित्रकला, कविता लेखन छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धेसाठीर प्रत्येकी 30 युवकांना सहभागी होता येईल. प्रथम पारितोषिक 1  हजार रुपये, द्वितीय 750, तृतीय 500 रूपये,  आणि स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.


जिल्हास्तरावर भाषण स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी  10 युवकांना सहभागी होता येईल. यासाठी प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय 2 हजार रुपये, तृतीय 1 हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात 10 संच सहभागी होईल  प्रथम बक्षिस 5 हजार रुपये, द्वितीय 5 हजार 250 रुपये, तृतीय 1 हजार 250 रूपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.यात सहभागी युवकांमधील विषयाची मांडणी वकृत्व शैली या आधारावर चार युवकांची परिक्षकातर्फे निवड करून प्रत्येक 1 हजार 500 रूपये बक्षिस म्हणून देण्यात येईल.


अधिक माहितीसाठी युवकांनी नेहरू युवा केंद्र राज निवास शिवराय नगर मालेगाव रोड तरोडा खु.नांदेड दुरध्वनी क्रमांक 02462-263403 येथे संपर्क साधावा नेहरू युवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment

Pages