विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचा समारोप क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून सर्वगुणसंपन्न नेतृत्व घडते -जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 10 January 2023

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचा समारोप क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून सर्वगुणसंपन्न नेतृत्व घडते -जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

      औरंगाबाद दि 10  : विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धामधून नेतृत्व गुण विकसित होऊन सर्व गुण संपन्न अधिकारी व कर्मचारी घडत असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले.  विभागीय क्रिडा, सांस्कृतिक स्पर्धेच्या बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. 

 तीन दिवसीय विभागीय महसूल क्रिडा स्पर्धेचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रिडा मैदानावर करण्यात आले होते. या क्रिडा स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात थाळी फेक, भाला फेक, गोळा फेक, उंच उडी, लांब उडी, टेबल टेनिस, लॉन टेनिस, फुटबॉल, थ्रो बॉल, यासह विविध क्रिडा प्रकाराचा समावेश होता. 

 जिल्हाधिकारी म्हणाले की औरंगाबाद जिल्ह्याने केलेले विभागीय क्रिडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन पाहता राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली तर आपला जिल्हा ह्या संधीचे देखील सोने करुन दाखवील असेही ते म्हणाले.

 विविध क्रिडास्पर्धामध्ये महिलांचा वाढता सहभाग महत्वाचा आहे. पुढील क्रिडा स्पर्धेमध्ये तो सर्व जिल्ह्यांनी आणखी कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. सांस्कृतिक स्पर्धेमधून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी नेहमी अशा  सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विविध स्पर्धांचे आयोजन देखील करावेअसे श्री. पाण्डेय यांनी सांगितले. 

 नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की,  व्यक्तीच्या जीवनात खेळ व कलेला महत्व असून ते जीवनाला पूर्णत्व प्रदान करते. क्रिडा स्पर्धा मधून सकारात्मक उर्जा मिळते. या स्पर्धेमध्ये स्वत:च्या क्षमता विकसित करुन त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करावा असे सांगून पारितोषिक विजेते खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

 अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी  प्रास्ताविक केले. ते म्हणाले मराठवाड्यातून 2 हजार खेळाडूंनी एकूण 84 क्रिडा प्रकारात सहभाग नोंदवला आहे. 120 पंचानी पंचाची भूमिका बजावली. क्रिडा स्पर्धा वरील खर्च हा शारीरिक क्षमता वाढीसाठी तसेच आरोग्यावरील गुंतवणुक समजली पाहिजे असे प्रास्तविकात डॉ.गव्हाणे यांनी सांगितले.


 या कार्यक्रमात सर्व उपजिल्हाधिकारी, यांचे उत्कृष्ट आयोजनाबाबत स्वागत, तसेच महसूल संघटनाचे पदधिकारी, पंच यांचा सत्कार करण्यात आला. तसेच  विविध क्रिडा प्रकारातील पारितोषिक वितरण करण्यात आले.

  यावेळी उपायुक्त पराग सोमन, पांडुरंग कुलकर्णी, समिक्षा चंद्रकार, सहायक जिल्हाधिकारी देवयानी यादव, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, डॉ भारत कदम यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, जर्नादन विधाते, तहसिलदार विजय चव्हाण यांच्यासह महसूल  अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages