आंबेडकरवादी मिशनच्या वतीने 'महात्मा फुले शिक्षण क्रांती राष्ट्रीय पुरस्कार' राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते प्रदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 3 January 2023

आंबेडकरवादी मिशनच्या वतीने 'महात्मा फुले शिक्षण क्रांती राष्ट्रीय पुरस्कार' राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते प्रदान

         पुणे ,जयवर्धन भोसीकर : 

 आंबेडकरवादी मिशनच्या वतीने 'महात्मा फुले शिक्षण क्रांती राष्ट्रीय पुरस्कार' डॉ. गोविंद नांदेडे,डॉ. राजेश गच्चे,डॉ. भास्कर दवणे ,दिपक कदम मान्यवरांना दिल्लीचे माजी समाज कल्याण मंत्री आ.राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 


     माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांना शिक्षण क्षेत्रातील मूल्यवान कार्याबद्दल, डॉ. राजेश गच्चे व डॉ. भास्कर दवणे यांना विज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन कार्याबद्दल सदर पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी माजी समाज कल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्यासह पुरस्कार प्राप्त मंडळींनी भारतात शिक्षण क्रांती घडवून आणण्यासंदर्भातील विचार मांडले. 


      आंबेडकरवादी मिशनने 25 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीत राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान राबवत लोहा, गंगाखेड, परभणी, पाथरी, माजलगाव, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सनसवाडी ता. शिरूर, भिमा कोरेगाव महात्मा फुले वाडा पुणे या ठिकाणी शिक्षण क्रांती साठीचा वैचारिक जागर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे झालेल्या सदरील अभियानाच्या समारोप समारंभात वरील पुरस्कार देण्यात आले. दीपक कदम यांच्या पुढाकारातून आंबेडकरवादी विचाराचे प्रशासकीय अधिकारी घडवण्यासाठी आंबेडकरवादी मिशन ही संस्था अविरतपणे कार्यरत आहे.

No comments:

Post a Comment

Pages