परभणी : शहरातील युनियन बँक, वसमत रोड येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती सह्याद्री फाउंडेशन, परभणी आणि एससी.एसटी. एम्प्लॉइज असोसिएशनच, परभणी तर्फे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक मॅनेजर मोहम्मद इलियास अन्सारी सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी मनोज बागल, सामाजिक कार्यकर्त्या रेणुका ताई साठे,ग्रामीण विकास अधिकारी उषा गावणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संदीप गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल बोलतांना असे मनाले की राजमाता जिजाऊ यांच्या सारख्या सक्षम महिला प्रत्येक घरात तयार व्हायला पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद राले, किशोर बरसगड़े,संदीप पवार,मकरंद, वाकळे, धनंजय, कदम, अमोल आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधिर साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सम्राट संभाजी पंचांगे यांनी मानले.
कार्यक्रमाचा समारोप चहा आणि नाष्टा सर्वांना देऊन करण्यात आला.
No comments:
Post a Comment