' पूर्वरंग ' मध्ये शनिवारी सिद्धार्थ उद्यानात गायन मैफल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 February 2023

' पूर्वरंग ' मध्ये शनिवारी सिद्धार्थ उद्यानात गायन मैफल

           औरंगाबाद दि १७  औरंगाबादच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान असणारा ‘वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव’ 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान सोनेरी महल येथे होणार आहे. तीन दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे कला, वादन, गायनाची, कथ्थकची सुरेख मैफल असणार आहे. या महोत्सवाची वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि नागरिकांना विविध कला प्रकारांचा अनुभव घेता यावा यासाठी ‘पूर्वरंग’ ह्या कार्यक्रमाची संकल्पना राबविण्यात येत आहे.


          ‘जागर इतिहासाचा लोककलेचा आणि संस्कृतीचा’ या  अंतर्गत 18 फेब्रुवारी 2023 रोजी सिद्धार्थ उद्यानात सायं ७ वाजता

 पं. विश्वनाथ दाशरथे यांचे उपशास्त्रीय गायन तर राहुल खरे यांचे भावगीत व भक्तीगीत रसिकांना ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला आमदार प्रदीप जैस्वाल, मानसिंग पवार, डॉ. छाया महाजन, डॉ.  भवान महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 


          या उपक्रमामुळे महोत्सवाचे वातावरण निर्माण हाऊन स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

Pages