कल्याण तालुक्यातील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या , जीवनदीप महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 May 2023

कल्याण तालुक्यातील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या , जीवनदीप महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

कल्याण : 

 जीवनदीप तालुक्यातील शैक्षणिक संस्थेच्या , जीवनदीप महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न  झाला.

     सन २००४ पासून कल्याण तालुक्यातील गोवेली या ग्रामीण भागात जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून श्री. रविंद्र नारायण घोडविंदे यांनी सुरू केलेल्या महाविद्यालयातून गेल्या १८ वर्षात अनेक पदवीधर पदवी प्राप्त करून विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान , व्यवसायिक अभ्यासक्रम तसेच एम. ए. , एम. कॉम. एम. एस्सी. या विविध विद्याशाखातून मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन करणाऱ्या १०८०  पदवीधारक विद्यार्थ्यांचा सन्मानपूर्वक पदवीप्रदान सोहळा संपन्न झाला.  या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेचे आमदार श्री. श्रीकांत भारतीय , मुरबाड विधानसभेचे आमदार श्री. किसनजी कथोरे,  मुंबई विद्यापिठाच्या मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिलकुमार सिंह , समाजसेवक सकिब गोरे , जीवनदीप संस्थेचे  अध्यक्ष श्री. रविंद्र घोडविंदे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. कोरे हे उपस्थित होते. प्रसंगी पदवी प्राप्त. विद्यार्थ्यांना उदबोधित करतांना आमदार श्री. श्रीकांत भारतीय यांनी "आपल्या पदवीचा समाजाला , राष्ट्राला  विधायक उपयोग व्हावा" असे मत व्यक्त केले. तसेच भारतीय शिक्षण परंपरा ही विश्वात आदर्शवत अशी पद्धती आहे. या परंपरेचा आणि संस्कृतीचा आपण सन्मान केला पाहिजे.  असेही प्रतिपादन केले. जीवनदीप संस्थेचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक प्रसंगी केले. अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आपल्या पाल्याच्या सन्मान पाहण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages