औरंगाबाद (प्रतिनिधी) :
आजच्या या अस्वस्थ काळात सोशल माध्यमांचा योग्य वापर करीत माणुसकीचे दर्शन घडले असून एम.जी.एम विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे मुळ कागदपत्रे हरविली होती; ती त्याला परत करण्यात आली आहेत.
एम.जी.एम विद्यापीठात बी.सी.ए साठी प्रवेश घेतलेल्या गौरव नागरेचे मुळ कागदपत्रे हरवली होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ती कागदपत्रे 'द पीपल्स पोस्ट'चे उपसंपादक प्रतीक माधुरी ओमप्रकाश कुकडे यांना सापडली. त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सादिक शेख व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा उपाध्यक्ष डॉ अमोल धंद्रे यांच्या मदतीने सामाजिक माध्यमांचा योग्य वापर करीत सदरील विद्यार्थ्यांला त्याची कागदपत्रे दिली आहेत. यातून एक सकारात्मक संदेश समाजाला जात आहे.
No comments:
Post a Comment