डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६५ वा वर्धापन दिन ; अभिनेत्री मधु कांबीकर यांना ’जीवनसाधना पुरस्कार’ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 22 August 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६५ वा वर्धापन दिन ; अभिनेत्री मधु कांबीकर यांना ’जीवनसाधना पुरस्कार’


औरंगाबाद, : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा ’जीवन साधना पुरस्कार’ प्रख्यात अभिनेत्री तथा लोककलावंत मधू कांबीकर यांना घोषित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ६५ व्या वर्धापन दिन सोहळयात बुधवारी (दि.२३) सदर पुरस्काराने वितरण कण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वर्धापन दिन (दि.२३) बुधवारी साजरा होणार आहे. मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते सकाळी १०ः३० वाजता विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात येईल. यानंतर विद्यापीठाच्या नाटयगृहात सकाळी ११ वाजता मुख्य सोहळा होईल. यावेळी राज्याचे माजी मुख्य सचिव ज्येष्ठ सनदी अधिकारी जे.पी.डांगे अध्यक्ष, (प्रवेश नियमन प्रशिक्षण)  यांची प्रमुख उपस्थिती राहील. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ.अकुंश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमा विद्यापीठाच्यावतीने यंदाचा जीवनसाधना पुरस्कार अभिनेत्री मधू कांबीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.भगवान साखळे व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages