नवी दिल्ली,26: महाराष्ट्र सदन येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग ,सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांच्या उपस्थित राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी आयुक्त सिंह यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संविधान उदेशिका ही आपल्या देशाच्या मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या उद्देशिकांवर आधारित आपण एक सुखी, समृद्ध आणि न्याय्य समाजाची निर्मिती करू शकतो.
या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर यांच्यासह महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते..
No comments:
Post a Comment