श्री गुरुगोविंद सिंघीजी पत्रकरिता महाविद्यालयामध्ये पत्रकार दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 6 January 2024

श्री गुरुगोविंद सिंघीजी पत्रकरिता महाविद्यालयामध्ये पत्रकार दिन साजरा


नांदेड, संजय नरवाडे :

 मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या  जयंतीनिमित्ताने मराठी पत्रकार दिन हा साजरा केला जातो. 6 जानेवारी 1832 मध्ये पहिले वृत्तपत्र,'दर्पण " बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली. श्री गुरुगोविंद सिंघीजी पत्रकारिता  महाविद्यालयामध्ये प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार डॉ. देवदत्त देशपांडे सर, विवेक पवार सर धर्मदाय आयुक्त कार्यालय नांदेड, श्री गुरुगोविंद  सिंघीजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम सर  यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन नरवाडे यांनी केले. कॉलेजची विद्यार्थिनी अनामिका शील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .महाविद्यालयाचे  प्रा. अमोल धुळे, प्रा. विपिन  कदम  प्रा.संजय नरवाडे,प्रा. शारदा कुलकर्णी, तसेच दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. खान मॅडम, प्रा. मुंडकर मॅडम, प्रा. कदम सर, केंद्र कृष्णा सर , कर्मचारी वृंद  बालाजी कुलकर्णी, रोहित माळी, भारत सोनटक्के, आदित्य कुंटे,विद्यार्थी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages