किनवट :
भारत सरकार च्या डेव्हलपमेंट कमिशन (हॅन्डक्राफ्ट) विभागा द्वारे संचालित हँडक्राफ्ट ऑफिस, औरंगाबाद यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे तीन दिवशीय शिल्प प्रदर्शन व जागरूकता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ( दि.०५.०८.२४) रोजी मार्गदर्शन मंचावरती अमन कुमार जैन, असिस्टंट डायरेक्टर हॅंडक्राफ्ट औरंगाबाद, शैलेंद्र सिंग एच.पी.ओ. असिस्टंट औरंगाबाद, मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडीचे सचिव अभि. प्रशांत ठमके,कोषाध्यक्षा शुभांगीताई ठमके,उपप्राचार्य राधेश्याम जाधव उपमुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमन कुमार जैन यांनी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या हस्तकला कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, सोलापूरची चादर, पैठणची पैठणी साडी, बंजारा हॅन्ड एम्ब्रोईडरी, पेबल आर्ट, वारली चित्रकला, अजिंठा चित्रकला, वूड क्राफ्ट आधी हस्तकला महाराष्ट्रात कशा पद्धतीने संवर्धन,प्रचार व प्रशिक्षण देण्याचे काम हस्तकला विभाग हे करत आहे याबाबत विस्तृत माहिती दिली.
या तीन दिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी मास्टर ट्रेनर म्हणून प्रल्हाद पवार, पेबल आर्ट, सुंदरलाल कुमावत, वारली चित्रकला, अजिंठा चित्रकला, पूजा कांबळे,बंजारा हॅन्ड एम्ब्रोईडरी, शेख शाकीर, वूड आर्ट याबाबतचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याकरता उपलब्ध होते.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी ( दि.०७.०८.२०२४) रोजी राजेश जाधव चेअरमन बंजारा आर्ट फाउंडेशन,यवतमाळ हे उपस्थित होते. बंजारा हँडक्राफ्ट याचा उगम मुळात बंजारा समाजातील स्त्रिया या फावल्या वेळेमध्ये करत असत, यातूनच बंजारा हँड एम्ब्रॉयडरी ही कला ओळखल्या गेली. अशी माहिती राजेश जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या हस्तकला व त्याची जोपासना कशा पद्धतीने करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक आर.व्ही. इंगळे, पर्यवेक्षक,किशोर डांगे, शिक्षक श्याम जायभाये, ग्रंथपाल विशाल गिमेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संतोष बैस ठाकूर यांनी केले तर आभार प्रा. सुबोध सर्पे यांनी मानले.
No comments:
Post a Comment