गोवेली( प्रतिनिधी ): जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडाविंदे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे अनेक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. दि.16/11/2024 रोजी विकसित महाराष्ट्रामध्ये तरुणांचे योगदान ,कर्तव्य आणि संधी या विषयावर आधारित मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मार्गदर्शनासाठी प्रमुख वक्ते म्हणून पत्रकारिता आणि आर्थिक स्थानिक कामांचा दांडगा अनुभव असलेले वरिष्ठ पत्रकार, लेखक, उत्तम व्याख्यानकार डॉ. उदय निरगुडकर हे उपस्थित राहिले होते. झी 24 तास ,न्यूज 18 लोकमत या वृत्तांचे आणि DNA या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे त्याचबरोबर सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक नवीन उपक्रम सुरू केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ के बी कोरे यांनी केले .डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व समजावून सांगितले शिस्तबद्ध राहण्यास प्रेरित केले तसेच दुसऱ्यांच्या चुकांवर टीका करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवण्याकडे लक्ष द्या असे सांगितले त्याचबरोबर त्यांनी विशेषतः मतदानावर भर दिला शंभर टक्के मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली सोशल मीडियाचा मानवी मेंदूवर होत असलेला परिणाम लक्षात आणून दिला. आणि त्यामुळे माणसांमध्ये होत असलेले मतभेद लक्षात आणून देऊन ते नियंत्रणात आणण्यासाठी आपण सावध असले पाहिजे तेव्हा ते म्हणाले, आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत. समाजामध्ये बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या या मार्गदर्शनामध्ये सगळेच अगदी मंत्रमुग्ध झाले होते. अनेक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांचे हे मार्गदर्शन उपस्थित सगळ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश लकडे यांनी केले.या कार्यक्रमाला चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन चे व्हॉइस प्रेसिडेंट विजय जोशी , कल्याण तालुका पत्रकार संघातील पत्रकार संजय कांबळे आणि विलास भोईर त्याचबरोबर जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे ,संचालक प्रशांत घोडविंदे ,सौ स्मिता घोडविंदे, प्राचार्य डॉ. के.बी.कोरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment