मुंबईच्या "एकजूट लेणी संवर्धक समूहाचा" सून अपरान्त - गोव्यात ३ दिवसीय लेणी अभ्यास दौरा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 6 November 2024

मुंबईच्या "एकजूट लेणी संवर्धक समूहाचा" सून अपरान्त - गोव्यात ३ दिवसीय लेणी अभ्यास दौरा संपन्न


मुंबई :  एकजूट लेणी संवर्धक प्रचार प्रसारक समूह, महाराष्ट्र राज्य आयोजित ३ दिवसीय " गोवा लेणी अभ्यास दौरा" साठी १-३ नोव्हेम्बर याकालावधीत गोव्यातील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबईहून १३ जणांचा समूह  गोव्यात दाखल झाला होता . या दौऱ्यात एकजूट लेणी चे प्रमुख सारिश (दादूस ) डोळस, ऍड खंडेश बगाटे,  अभिजीत बनसोडे, संदीप पाटील, राकेश पवार, सचिन मर्चंडे , नितीन जाधव , बबन ओव्हाळ, अरविंद सावंत, सुरेश माने , स्वप्नील ओव्हाळ , शुभम डोळस, दयानंद जाधव आणि "लेणी संवाद"चे प्रफुल्ल पुरळकर उपस्थित होते .

 ह्या दौऱ्याचे नियोजन   प्रफुल्ल पुरळकर व सारिश (दादूस ) डोळस यांनी केले  होते तर मार्गदर्शक गोव्याचे राहुल तायडे हे होते . ह्या दौऱ्यात या समूहाने ९ लेण्या - ऍडकोन , हरवळे , लामगाव   खांडेपार, ईश्वरभट ,मंगेशी, अक्वेम , रिवोना १ व २ , दत्त लेणी पहिल्या.  त्यासोबतच त्यांनी मंदिरे, कातळशिल्प , समुद्र किनारे , पुरातत्व म्युझियम असे एकूण २६ प्रेक्षणीय / पुरातत्वीय स्थळे पाहिलीत.  या दौऱ्यासाठी स्थानिक डॉ सुहास चांदेलकर , एस के चांदेलकर, अर्जुन जाधव, राहुल तायडे व प्रवीण गांगुर्डे यांनी विशेष सहकार्य केले. यांच्यामुळे हा दौरा यशस्वी झाला. यापूर्वी  एकजूट लेणी संवर्धक समूहाने , पुणे, जुन्नर , औरंगाबाद, सातारा, कोकण, कोल्हापूर, जयसिंगपूर,पंढरपूर  येथे अशा प्रकारच्या लेणी अभ्यासाचे दौरे आयोजीत केले होते.

No comments:

Post a Comment

Pages