"स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक मोती कृतार्थ वंसुधरेने झेलावे छातीवरती.".. बहारदार रचनेने बळीराम पाटील महाविद्यालयात कविसंमेलन संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 21 January 2025

"स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक मोती कृतार्थ वंसुधरेने झेलावे छातीवरती.".. बहारदार रचनेने बळीराम पाटील महाविद्यालयात कविसंमेलन संपन्न

किनवट ता. प्रतिनिधी :

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य 

डॉ.एस.के.बेंबरेकर , प्रसिद्ध कवी नंदन नांगरे, डॉ.प्रकाश मोगले, वंदना तामगाडगे,रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांनी बहारदार रंचना सादर केले.प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी केले.

नंदन नांगरे यांनी आपली रचना सादर करतांना म्हणाले आपल्या माणंसासी एक निष्ठ राहा

स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे.

हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे.

ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक - मोती 

कृतार्थ वसुंधरेने झेलावे छातीवरती 

मातीच्या गंध फुलांनी वाऱ्यावर मस्त झुलावे.


बाई मी दयन दईता 

गाते भीमाची व गाणी 

भीम झाला आमचा नेता 

गेली जळून गुलामी 

अशा रंचना सादर केले.या प्रसंगी प्रकाश मोगले यांनी रंचना सादर केले.

कवी रमेश मुनेश्वर यांनी कविता सादर करतांना म्हणाले 


उठा युवकांनो तुम्ही

भविष्याकडे बघा

सुंदर हे जीवन आपले

तीला तुम्ही जगा...

संविधान घ्या हाती

लढा तुम्ही न्यायासाठी

आधारस्तंभ या देशाचे

नव्याने तुम्ही घडवा...


'आई माय जननी

अनेक शब्दात तू ..

माझ्या शरिरातील

नसानसात तू ..

तुझी सर कुणा येईल 

सांग ना !

तुच दिलेला श्वास

हृदयात ना !!'

तर कवी राजेश पाटील यांनी

जोडीण निघाले जोती अन सावीत्री 

जोडीण निघाले जोती अन सावीत्री 

 झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री

 झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री

त्या लिबांच्या झाडाखाली सावली होती

 तेंव्हाच तु मला !!!!!!! 

ही तरुणाईच्या मनाचा ठाव घेणारी रचना सादर केली.

या नंतर कवयत्री वंदना तामगाडगे

यांनी स्त्रीवादी कविता सादर केल्या

माझा जन्म झाला तेंव्हा 

आई वडील हिरमुसले

मुलगी का झाली

हेच कारण सर्वांनी पुसले

व 

सुंदर जिवन जगण्यासाठी

दुर्जन संगत धरु नका

उगाच मानापानासाठी

रात्रंदिवस झुरु नका या रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविले.

अध्यक्षीय समारोप डॉ.आनंद भालेराव, सूत्रसंचालन प्रा प्रल्हाद जाधव आभार प्रा.दयानंद वाघमारे यांनी केले.या प्रसंगी प्रा.ममता जोनपेलीवार, ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, डॉ.प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ.शुंभागी दिवे,प्रा आम्रपाली हटकर,डॉ.सुलोचना जाधव, डॉ स्वाती कुरमे, डॉ.रचना हिपळगावकर,

प्रा.सुभाष काळे,प्रा.सतीश मिराशे, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages