औरंगाबाद :
व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तिरंगी ध्वज फडकून सलामी देण्यात आली व रॅली ला सुरुवात करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारकास पुष्प हार अर्पण करून रॅली इन्स्टिट्यूट प्रांगनामद्ये दाखल होऊन कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.राहुल वाहूळ, सुभाषचंद पाटणी,सागर पाटणी,प्रमोद पानसरे,वसंतराव धुळे बाबा,नंदाआई धुळे, मनीष शेळके, संजोग शेंडे, नसरीन शहा,रुख्मिणी दाभाडे, आशिष काळबांडे,संदीप लिंगे, अल्का ताई धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमद्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रमोद धुळे सर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले.यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धे मद्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.2024 मद्ये कम्पुटर संच साठी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढण्यात आले यावेळी अनुक्रमे मेहविम शेख, सानिया शाह, आरती राऊत,संतोषी मालोदकर,परिहान शेख यांची नावे सर्वानुमते लकी ड्रॉ पद्धतीने कम्पुटर संचा साठी जाहिर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता खोडवे यांनी केले तर आभार प्रीती ढगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी पूनम सोनवणे,प्रीती राठोड, पल्लवी देशमुख,योगेश इंगळे, मनमत गुंडे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment