जिल्हा कोषागार कार्यालयाकडून नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 31 January 2025

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान

नांदेड दि. 31 : संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण देऊन तयार केले. कोषागारे कर्मचारी यांनी सुंदर असे सलामी व पथसंचलन केले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषक आणले आहे. त्याबद्दल नांदेड पोलिस दलात कार्य करणारे पोलिस कर्मचारी सदानंद सपकाळे यांना जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृताल कश्यप बगाटे , बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांनी पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला व पुढील कार्यास शभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Pages