रविवारी नांदेडात फुले-आंबेडकरी समकालीन राजकारण पुस्तक प्रकाशन आणि चर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 17 January 2025

रविवारी नांदेडात फुले-आंबेडकरी समकालीन राजकारण पुस्तक प्रकाशन आणि चर्चा


नांदेड दि.१७ : बुद्धीस्ट सोशल ऑर्गनायझेशन, नांदेड च्या वतीने 'सेक्युलर मुव्हमेंट', या संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे संपादित व संकलित 'फुले-आंबेडकरी समकालीन राजकारण', या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यावर चर्चा रविवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजता व्हीआयपी रेस्ट हाऊस, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे,या कार्यक्रमास जिल्ह्यातील फुले -आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन 'सेक्युलर मुव्हमेंट',या फुले- आंबेडकरी सामाजिक संघटनेचे जिल्हा संघटक ॲड.मिलिंद सर्पे यांनी केले आहे.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले -आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार व जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड हे राहणार आहेत. वक्ते म्हणून प्रा. डॉ. प्रकाश मोगले व मिलिंद बनसोडे हे राहणार आहेत.प्रास्ताविक दिगंबर मोरे हे करणार आहेत,तर भूमिका प्रा. गौतमीपुत्र कांबळे मांडणार आहेत.यावेळी ठाण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त व सेक्युलर मुव्हमेंट चे कार्याध्यक्ष 

भरत शेळके, जिल्ह्याचे भूमिपुत्र व सेक्युलर मुव्हमेंट चे राज्य उपाध्यक्ष डॉ.अशोक गायकवाड,  ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे(मुंबई), पी.एस. गवळे, कवी व नाट्यलेखक नंदन नांगरे,  नाट्य कलावंत विजयकुमार माहुरे यांची सन्मानीय उपस्थिती राहणार आहे. दत्ता हरी धोत्रे हे आभारप्रदर्शन करणार आहेत.


No comments:

Post a Comment

Pages