कविता जगण्याला बळ देते - डॉ. विनायक पवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 26 February 2025

कविता जगण्याला बळ देते - डॉ. विनायक पवार

गोवेली : जेव्हा कवी आपल्या भावना,अनुभव व्यक्त करत कवितेचे लेखन करतो आणि मग त्या कवितेला किंवा गाण्याला वाद्यांची साथ देऊन संगीत तयार होते त्या संगीताचा आपल्या मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होत असतो. आणि या कवितांमुळेच माणसाच्या जगण्याला बळ मिळते असं वक्तव्य चित्रपट गीतकार,कवी डॉ. विनायक पवार यांनी केले.जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे दि 25 फेब्रुवारी 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील विद्यार्थ्यांचा ,कला क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा वार्षिक गुणगौरव समारंभ व स्नेहसंमेलनाचे आयोजन केले गेले होते. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट गीतकार, कवी प्रा.डॉ.विनायक पवार आणि सिने नाट्य अभिनेत्री धनश्री दळवी यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा डॉ के बी.कोरे यांनी केले.उपस्थित मान्यवरांपैकी डॉ. पवार यांनी त्यांच्या कविता सादर करीत मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित अभिनेत्री धनश्री दळवी यांनी देखील त्यांचे अनुभव , आठवणी सांगत विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळेस उपस्थित माजी विद्यार्थ्यांकडून विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना सादर करण्याची संधी दिली गेली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी विभागातील प्राध्यापक आंतरराष्ट्रीय स्तरावरील लावणी कलावंत प्रा. महेश थोरात यांनी लाईव्ह लावणी सादर केली व या लावणीच्या ठेक्यावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विनायक पवार आणि धनश्री दळवी हे पण लावणीत सहभागी झाले.आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सतीश लकडे यांनी केले. 


यावेळेस जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, उपाध्यक्ष शांताराम भोईर, अधिकारी कल्याण विश्वास गुजर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष बाळू फुलारे,  सुदाम पाटील ,न्यूज18  लोकमतचे वरिष्ठ निर्माता शंकर कांबळे,नेताजी भोईर, बाळाराम चौधरी, नारायण घरत, बाळाराम कोर ,शंकर भोईर, गणेश मलबारी, मिलिंद चंदने, सुनील सुरोशी, सुरेखा भोईर, सुरेश टेंभे, तुकाराम बुटेरे, दिपाली बुटरे, दिलीप बुटेरे, अनंत कोर, जितेंद्र भोईर , म्हसा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माळी सर, भगवान भावार्थे, ॲड.जयेश मोहिते, विश्वास मिरकुटे, तसेच महाविद्यालयाच्या संचालिका स्मिता घोडविंदे ,संचालक प्रशांत घोडविंदे ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश रोहणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा महेश थोरात,सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Pages