नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त संकुलाच्या वतीने रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माजी विदयार्थी मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी दहा वाजता भाषा संकुलात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार आणि संकुलाच्या प्रारंभीच्या काळात ज्यांनी या संकुलात अध्यापन करून या संकुलाची पायाभरणी केली. ते ज्येष्ठ समीक्षक भू. द. वाडीकर, डॉ. आर व्यंकटेश्वरलु, प्रा. मधुकर राहेगावकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या 25 वर्षात भाषा संकुलातील अनेक विद्यार्थी लेखक कवी अभ्यासक म्हणून नावारूपाला आले. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. असे सर्व माजी विद्यार्थी या सोहळ्यानिमित्त एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहकार्यातून संकुलात भाषा प्रयोगशाळेची उभारणी देखील करण्यात येत आहे.
तरी या सोहळ्यास भाषा संकुलातील सर्व माजी विद्यार्थी- विदयार्थीनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रमेश ढगे, भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment