नांदेड ,प्रतिनिधी :
भोकर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मागील आढावा घेण्यात आला ,तसेच पुढील काळामध्ये गाव तिथे शाखा व पक्ष सदस्य नोंदणी अभियान संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आले .तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख आहे यामुळे भोकर मतदार संघातील अनेक युवक हे
ना .अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादी युवक कांग्रेस मधे काम करण्यास इच्छुक आहेत. जिल्ह्याचे नेते मा प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या सोबत चर्चा करून या सर्व युवकांचा प्रवेश राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात करून घेण्यात येईल तसेच भोकर मतदार संघात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक हे बेरोजगार आहेत त्त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात रोजगार मेळावा घेण्यात येईल असे प्रतिपादन इंजी स्वप्निल इंगळे पाटील यांनी केले.
या बैठकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनाथ गिरी, वैद्यकीय आघाडी चे अमोल मालेगावकर, उत्तर तालुका अध्यक्ष पांडुरंग पावडे, गजू भाऊ एरलेवाड, संदीप भैया अटकोरे, श्रीनिवास पाटील हिवराळे, भोकर तालुका अध्यक्ष गजानन पाटील,शहर अध्यक्ष मजहर भाई, कार्याध्यक्ष सय्यद जफर
कांबळे महेंद्र तालुका सचिव, शहराध्यक्ष फहीम पटेल साहेबराव वाहूळकर, शेख शादुल्ला भाई, प्रकाश अण्णा बोंदिरवाड तालुका उपाध्यक्ष, सुनिता ताई बेसिनलोड, कल्पनाताई कदम,गायकवाड काकू,, परसु पाटील दौरकर, सक्रिय सामाजिक कार्यकर्ता , सह असंख्य युवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment