माहूर :
कृषी दिनानिमित्त दिनांक 01/07/2025 रोजी तत्कालीन कनिष्ठ अभियंता वाई बाजार कुलकर्णी साहेब यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करणे बंधनकारक असताना देखील संबंधित कनिष्ठ अभियंता कडून जाणीवपूर्वक कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली नसल्यामुळे दोशी कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांना कर्तव्यात कसूर केल्यासह महामानवाचा अवमान केल्याप्रकरणी चौकशी करून निलंबितासह बडतर्फ करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ कार्यालय नांदेड, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नांदेड, येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वाई बाजार येथील महावितरण उपकेंद्रावर कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांची आपल्या कार्यालयात जयंती साजरी न केल्यामुळे तालुक्यातील समाज बांधवाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अनेक निवेदन देण्यात आले तसेच, आंदोलन करून निषेध करण्यात आले. मात्र दोषी कनिष्ठ अभियंतावर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कुलकर्णी कनिष्ठ अभियंताची पाठ राखण होत असल्याने येत्या सात दिवसात कारवाई करण्यात आली नाही. तर समाजबांधवा सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरणच्या संपूर्ण जिल्ह्यातील तालुकास्तरावरील प्रत्येक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे सूचक तीव्र शब्दात अवमान करणाऱ्या कनिष्ठ अभियंताचा जाहीर निषेध करून निवेदनात तीव्र शब्दात निलंबनासह बडतर्फीची कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदनात नमूद करून मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी कारवाईस्तव वरिष्ठांकडे मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment