लोहा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावाचा सक्तीय सहभाग असला पाहिजे यासाठी ग्रामसेवकानी आपापल्या गावात जाऊन सर्व माहिती द्यावी विविध विभागात होणारी कामे त्याचे गुणांकन व त्यानंतर गावासाठी
५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे याची माहिती द्यावी, कामात दिरंगाई करू नका. ग्रामसभा घेऊन सर्व ग्रामस्थांचा सहभाग नोंदवावा व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले
लोहा येथील के.के. चव्हाण मंगल कार्यालयात (ता.२४ ) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची लोहा व कंधार पंचायत समितीचे आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक डाॅ संजय तुबाकले, उपमुख्यकार्यकरी अधिकारी (पंचायत,) दतात्रय गिरी, मुख्य लेखा व वित अधिकारी श्री चना, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डास प्रविण घुले, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, लोहा बीडीओ महेंद्र कुळकर्णी, कंधार बीडीओ महेश पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी माने, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, लोहा कृउबा समितीचे उपसभापती अण्णाराव पाटील , पं.स.चे घरकुल विभागाचे प्रमुख दिनेश तेलंग, सहायक कक्ष अधिकारी पाठक, ग्रामविकास अधिकारी गजानन शिंदे, अरुण चौधरी, यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थिती होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी लोहा व कंधार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या घरकुल, शिक्षण, स्वच्छता, कृषी आदी सर्व विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामसेवकांना, पं.स.च्या सर्व विस्तार अधिकारी, शिक्षण विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना कामातील दिरंगाई बाबत तंबी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानयोजनेची संपुर्ण माहिती घ्या, रजिस्ट्रेशन करा. प्रचार प्रसार करा. सरपंचासहित संपूर्ण गावाला अभियानात सामील करून घेण्यासाठी ग्रामसभा घ्या .आपले गाव समृद्ध झाले पाहिजे हे ग्रामस्थांना सांगावे व त्याच्या सहभागातून हे अभियान लोकचळवळ बनले पाहिजे व यशस्वी झाले पाहिजे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले.
ग्रामसेवकांनी व सर्व विभागांच्या प्रमुखांनी पुढच्या बैठकी पर्यंत कामाचे मूर्त स्वरूप दिसले पाहिजे. पुन्हा बैठक होईल. या योजनेत ५ कोटी रुपयांचे बक्षीस असल्यामुळे या निधीतून गावात रस्त्यासहित आदी विविध कामे करता येतील. त्यासाठी एकजुटीने गावाचा सहभाग महत्वाचा आहे, असे सांगितले. बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केल्या बद्दल लोहा बीडीओ कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला
अनुपस्थित ग्रामसेवकावर कार्यवाही होणार
आढावा बैठकीला जे ग्रामसेवक या बेठकीला गैरहजर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले. दरम्यान रुजू झाल्या नंतर दोन्ही तालुक्यात पहिलीच आढावा बैठक सीईओ मेघना कावली यांनी घेतली .ग्रामसेवक संघटना तसेच पंचायत समितीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सुञसंचालन ग्रामपंचायत अधिकारी जाधव यांनी तर आभार विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे यांनी केले.
No comments:
Post a Comment