मुगट , शुभम हटकर :-
मराठवाड्यातील असामानी अतिवृष्टी चे संकट पडल्याने मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरातील ही शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खुप हवालदिल झाला आहे. तोंडाला आलेला घास मेघराज्याच्या कोपाने शेतकऱ्यांच्या तोंडोतून हिसकावुन घेतला आहे, तोंडावर आलेल्या सोयाबीनची कापनी ते सोयाबीन पाण्यात सडतय आहे . जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी त्यावरच आज उपास मारिची वेळ आलेली आहे.
खबाड कष्ट करुन जिवाच रान करुन शेतकरी शेती करत असतो त्यातून त्याचा काही उदार निर्वाह व्हावा म्हणून पण या वर्षी या अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेची निराशा केली आहे. कारण
"पावसाचे पाणी कमी होत नाही आणि शेतकऱ्यांचे दुःख ही कमी होत नाहीत"पावसामुळे डोळ्यासमोर असलेली उभे पिके आज पाण्यात सडतायेत शेतऱ्यांचा जिव तडपतोय. "शेतकऱ्यांच सरण आज पाण्यात जळतय"
आदि मुग, उदंड, गेला आता सोयाबीन पाण्यात सडतय, कापसाचे बोंड पाण्यात नसतात आहेत, हळदी मध्ये पाणी भरुन आहे, उभ्या केळ्या पाण्यान पडून गेल्या..हे सर्व पाहून शेतकऱ्यांचे आश्रूने डोळे भरून वाहत आहेत. शेतकऱ्याचा आश्रा म्हणजे शेती पण तिच पाण्याण पूर्ण भरून गेली आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न होरपळून गेले आहेत. शेतकरी राजा आज खुप हातबल झाला. कारण हे सरकार शेतकऱ्यांचे भावनांशी खेळतय शेतकऱ्यांना अजून ही कर्ज माफी नाही,वेळेवर पिक विमा मिळत नाही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो बाजार भाव नाही, शेतकऱ्यांच्या उध्वस्त जिंदगीचा बाजार झालाय.. ऐण सना सुदिच्या काळात हे अतिवृष्टी चे संकट त्यात शेतकरी अर्थिक दृष्ट्या खुप हातबल झाला आहे.कारण सर्व पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.
सरकार ने ओला दुष्काळ जाहीर करावा. विमा येतो परंतू या तुटपुंजीत शेतकऱ्यांच काय होईल हा प्रश्न आज शेतकरी करतोय. शेत मशागतीसाठी पुरक साधने देखील या रक्कम मध्ये येणार नाहीत. शेतकऱ्यांना विषेश निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी..शेतकऱ्यांसाठी दिवाळी विषेश अनूदान उपलब्ध करुण द्यावे. कारण ह्या पुराच्या संकटाने शेतकरी आजच्या घडीला खूप मोठे संकट आलेल आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विषेश मदतीची खुप गरज आहे. शेतकऱ्यांवर आलेल हे पुराचे संकट भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फिस माफ करावी. कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत तर अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
"सरकार बांधावर पण शेतकऱ्यांचे दु:ख मात्र शेताच, शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र धुऱ्यावरच कारण अजून हि शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही. दिवाळी पूर्वी सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी व्हावी.
शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी मुगट येथील मुग, उडिद ,सोयाबिण ,केळी, कापूस ,हाळद या पिकांचे मोठ्याप्रमाणात अतोनात नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी व नदी काठी असणाऱ्या शेतात बॅक वॉटर येणार नाही याची उपाय योजना
करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करुण हेक्टरी ५० हजार रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..!
No comments:
Post a Comment