धम्मदीक्षा वर्धापन महोत्सवानिमित्त भव्य महावंदना समारोह - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 30 September 2025

धम्मदीक्षा वर्धापन महोत्सवानिमित्त भव्य महावंदना समारोह

 धम्मदीक्षा वर्धापन महोत्सवानिमित्त भव्य महावंदना समारोह


नांदेड – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी, दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांच्या साक्षीने घेतलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त, नांदेडकरांच्या वतीने महावंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्ताचा एकही थेंब न सांडता, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली घडवून आणलेले धर्मांतर हे केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्यापुरते मर्यादित नव्हते. हे कोणतेही आर्थिक वा इतर स्वार्थी प्रलोभनातून घेतलेले पाऊल नव्हते, तर माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी, अन्याय, विषमता आणि शोषणाच्या विरुद्ध केलेला निर्धार होता. म्हणूनच या अद्वितीय आणि ऐतिहासिक क्रांतीचा उल्लेख जागतिक स्तरावरही एक अभूतपूर्व सामाजिक परिवर्तन म्हणून केला जातो. 

या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून, महाविहार बावरीनगर तसेच संपूर्ण नांदेड वासीयांच्या वतीने, श्रद्धेय भिक्खु संघाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य महावंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रेल्वे स्टेशनसमोर, नांदेड येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ५.४५ वाजता, श्रद्धेय भिक्खु संघाच्या उपस्थितीत भव्य महावंदना कार्यक्रम संपन्न होणार आहे.समाजातील प्रत्येकाने आपले सामाजिक भान जपत, ठरलेल्या वेळी पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages