आदिवासींचा महामोर्चा : आरक्षणावरील हक्कांसाठी कडाडून विरोध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 23 September 2025

आदिवासींचा महामोर्चा : आरक्षणावरील हक्कांसाठी कडाडून विरोध


किनवट, दि. 23 : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी किनवट येथे आज आदिवासी समाजाचा भव्य महामोर्चा काढण्यात आला. गोंडराजे हुतात्मा शंकर शहा–रघुनाथ शहा मैदान येथून निघालेला हा मोर्चा उपविभागीय कार्यालयात पोहोचला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार भिमराव केराम यांनी केले.मोर्चात पारंपरिक ठेमसा नृत्य, आकर्षक पोशाख आणि महिलांचा उल्लेखनीय सहभाग यामुळे वातावरण ऐतिहासिक झाले. नंतर झालेल्या सभेत आ. केराम, नारायणराव सिडाम, प्रा. किशन मिरासे आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले. केराम म्हणाले, “आरक्षण हा घटनादत्त अधिकार आहे. तो हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रात उलगुलान उभा राहील.”शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत बंजारा समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करण्यास तीव्र विरोध नोंदविला. यावेळी त्यांनी घटनात्मक अडथळे, लोकुर समितीचे निकष लागू न होणे, आदिवासी हक्कांवर परिणाम होणे तसेच हैद्राबाद गॅझेटीयरचा आधार ग्राह्य धरता येणार नाही, अशी कारणे मांडली.मुख्यमंत्री व राज्य सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावावा, अशी ठाम मागणी सभेतून करण्यात आली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने युवकांनी पुढाकार घेतला.



No comments:

Post a Comment

Pages