बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन
मुंबई , प्रतिनिधी 14 - केल्याशिवाय ऐक्याचा प्रहार मुक्त होणार नाही महाबोधी महाविहार अशी काव्यमय सुरुवात करून आंबेडकरी बौद्ध जनतेने सामाजिक धार्मिक राजकीय राज्य करणे आवश्यक आहे. माझ्या निमंत्रणाला मान देऊन सर्व पक्षीय बौद्ध नेते मोर्चास उपस्थित राहिले.प्रा4.जोगेंद्र कवाडे यांना आणि मला ही वाटते की रिपब्लिकन ऐक्य व्हावे .काही लोकांना वाटते की ऐक्य होऊ नये.प्रकाश आंबेडकर यांनीही समाजाच्या एकजुटी साठी प्रयत्न करायला पाहिजे होते. मी मंत्री असलो तरी आंबेडकरी कार्यकर्ता आहे.त्यामुळे मंत्री असलो तरी मी नामंतरासाठी मोर्चे काढले होते आता महाबोधी महाविहार मुक्ती साठी मोर्चा काढला आहे.बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नावर बौद्धांना न्याय द्यावाच लागेल.बी टी ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावेच लागेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी आज 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून
सर्व पक्षीय बौद्ध नेते ;सर्व रिपब्लिकन गट आणि सर्व बौद्ध संघटनांच्या एकजुटीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती च्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात आला.या विराट मोर्चात राज्यातील सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेने रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन घडविले.या बौद्ध जनतेच्या एकजुटी च्या मोर्चात राजकारणा पलीकडे जाऊन सर्व पक्षीय बौद्ध नेते एकजूट झाले होते.यावेळी पूज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो , भंते विनाचार्य, भदंत हर्षवोधी;आकाश लामा ,आदी भिक्खू संघ उपस्थित होते.
यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिति चे निमंत्रक केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले , प्रा.जोगेंद्र कवाडे , डॉ.राजेंद्र गवई , नानासाहेब इंदिसे , सुरेश माने ,सौ. सीमाताई आठवले , सुलेखाताई कुंभारे , खासदार वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार राजकुमार बडोले , आमदार संजय बनसोडे, आमदार बालाजी किणीकर , आमदार संतोष बांगार , अर्जुन डांगळे , सभेचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले यावेळी अविनाश महातेकर , देशक खोब्रागडे , चंद्रबोधी पाटील , काकासाहेब खांबलकर , जीत आठवले , जयदीप कवाडे , पप्पू कागदे , आनंद शिंदे , राजू वाघमारे , तानसेन ननावरे , राजा सरवदे; बाबुरव कदम , सागर संसारे , सुनील निर्भवने , अविनाश कांबळे , कुणाल कांबळे , बुद्धभूषण गोटे, सुरेश सावंत, घनश्याम चिरणकर , विलास रूपवते , रवी गरुड , मिलिंद सुर्वे ,श्रीकांत भालेराव ,दयाळ बहादुर , सिद्धार्थ कासारे , विवेक पवार, चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment