किनवट : तालुक्यातील उर्वरीत लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तसेच ७० व ७० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड निर्माण व वितरण वेगाने पूर्ण करण्यासाठी किनवट तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती तालुका पुरवठा निरीक्षक निलेश राठोड यांनी दिली.
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार मंडळस्तरावर घेण्यात येणाऱ्या या कॅम्पमध्ये लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील ऑपरेटर आणि स्वस्त धान्य दुकानचालक यांच्या मार्फत केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या नियमांनुसार दिलेल्या लॉगिनद्वारे सात दिवसांत एकही ई-केवायसी न झाल्यास लॉगिन आपोआप निष्क्रिय होईल. त्यामुळे सर्व कर्मचारी व ऑपरेटर यांना दररोज किमान २५ ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तहसीलदार किनवट यांच्या आदेशानुसार मंडळनिहाय कॅम्पचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
किनवट मंडळ : ७ ऑक्टोबर २०२५
बोधडी बु. मंडळ : ८ ऑक्टोबर २०२५
सिंदगी मंडळ : ९ ऑक्टोबर २०२५
जलधरा मंडळ : १० ऑक्टोबर २०२५
ईस्लापूर मंडळ : १३ ऑक्टोबर २०२५
शिवणी मंडळ : १४ ऑक्टोबर २०२५
दहेली मंडळ : १४ ऑक्टोबर २०२५
उमरी मंडळ : १५ ऑक्टोबर २०२५
मांडवी मंडळ : १६ ऑक्टोबर २०२५
या कॅम्पसाठी लाभार्थ्यांनी आधारकार्डसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. मंडळ अधिकारी, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, आशा कर्मचारी आणि आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी यांनी लाभार्थ्यांना सूचित करून कॅम्प यशस्वी करण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे तहसील कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment