किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ : आरक्षण सोडत जाहीर
महिलांना मोठे प्रतिनिधित्व; ८ ऑक्टोबर रोजी सोडत प्रक्रिया पार
किनवट ,दि.८ : किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज( दि. ८) रोजी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या उपस्थितीत पार पडली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित राहून या सोडतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
एकूण दहा प्रभागांतील जागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामनिर्देशित मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यंदाच्या आरक्षणात महिलांना लक्षणीय प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले आहे.
🔹 प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे:
1️⃣ प्र.क्र.1 – (अ) अनुसूचित जमाती, (ब) खुला (महिला)
2️⃣ प्र.क्र.2 – (अ) अनुसूचित जाती (महिला), (ब) सर्वसाधारण
3️⃣ प्र.क्र.3 – (अ) ना.मा.प्र. (महिला), (ब) सर्वसाधारण
4️⃣ प्र.क्र.4 – (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण (महिला)
5️⃣ प्र.क्र.5 – (अ) ना.मा.प्र. (सर्वसाधारण), (ब) सर्वसाधारण (महिला)
6️⃣ प्र.क्र.6 – (अ) ना.मा.प्र. (सर्वसाधारण), (ब) सर्वसाधारण (महिला)
7️⃣ प्र.क्र.7 – (अ) अनुसूचित जाती (महिला), (ब) सर्वसाधारण
8️⃣ प्र.क्र.8 – (अ) ना.मा.प्र. (महिला), (ब) सर्वसाधारण
9️⃣ प्र.क्र.9 – (अ) ना.मा.प्र. (महिला), (ब) सर्वसाधारण
🔟 प्र.क्र.10 – (अ) ना.मा.प्र. (सर्वसाधारण), (ब) सर्वसाधारण (महिला), (क) सर्वसाधारण (महिला)
या आरक्षणानुसार उमेदवार आता निवडणूक लढविण्यासाठी तयारीला लागले असून, पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नगरपरिषदेत यंदा महिला उमेदवारांची उपस्थिती विशेष ठरणार असून, राजकीय पक्ष तसेच स्वयंस्फूर्त गटांनी रणसज्जता सुरू केली आहे. यावेळी मुख्याधिकारी, नगरपरिषद किनवट व सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment