समाजसेविका सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर ' महाराष्ट्र रत्न सन्मान ' पुरस्काराने सन्मानित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 4 October 2025

समाजसेविका सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर ' महाराष्ट्र रत्न सन्मान ' पुरस्काराने सन्मानित


  नांदेड, संजय नरवाडे    : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात भरीव असे योगदान दिल्याबद्दल सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांना लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीने महाराष्ट्र रत्न सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी लोकशाहीचे संपादक विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये थाटात संपन्न झाला.


नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यातील युवक , युवती आणि महिलांच्या आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक , कृषी विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर ह्या निस्वार्थपणे काम करत आहेत. महिलाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन शिवालया उद्योग समूहाच्या माध्यमातून बचत गटांना अर्थसहाय्य केले आहे. शेती पूरक व्यवसायाला चालना देऊन शेतकरी महिलांना सक्षम करण्यासाठीही त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. याशिवाय रोजगार मेळावे , रक्तदान शिबिर , वृक्षारोपण , बेटी बचाव बेटी पढाव आदी सामाजिक उपक्रमात त्यांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे. या एकूण कार्याची दखल घेऊन लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीने दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा ' महाराष्ट्र रत्न सन्मान ' त्यांना प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages