विघातक पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर पोलिसांची झडती; सोशल मीडियावर कडक नजर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 29 November 2025

विघातक पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर पोलिसांची झडती; सोशल मीडियावर कडक नजर

 विघातक पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर पोलिसांची झडती; सोशल मीडियावर कडक नजर



नांदेड : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील प्रचाराला उधाण आले असून, आचारसंहिता भंग करणाऱ्या पोस्ट्सवर आता सायबर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र पथके कार्यरत झाली असून शांतता भंग करणाऱ्या, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या सामग्रीवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.


डिजिटल माध्यमांचा वापर वाढल्याने उमेदवार आणि पक्षांकडून प्रचाराचा जोर वाढला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह विविध प्लॅटफॉर्मवर पोस्ट्स, रील्स आणि स्टेटसचा पाऊस पडत आहे. मात्र या प्रचारात गैरप्रकारांना स्थान देणाऱ्यांना थेट गुन्हा दाखल होण्याचा धोका असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


फॉरवर्ड करण्यापूर्वी खबरदारीची गरज

कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी ती सत्य आहे का, तिच्यामुळे कोणाची बदनामी होत आहे का किंवा समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे का, हे तपासणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


या पोस्टवर तातडीची कारवाई

जातीय किंवा धार्मिक वैमनस्य वाढवणाऱ्या टिप्पणी

अफवा, खोटी माहिती किंवा अपप्रचार

हिंसक व भडकावू सामग्री

वैयक्तिक द्वेषयुक्त टीका

नियमबाह्य प्रचार

निवडणूक पथक अशा पोस्ट्सची नियमित तपासणी करीत असून उल्लंघन आढळल्यास नोटीस न देता थेट कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


जामिनाशिवाय अटकेची तरतूद


रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्टसह भारतीय न्यायसंहितेतील तरतुदीनुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जामिनाशिवाय अटक, दंड आणि कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages