फॅम तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'एक वही एक पेन' अभियान ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 3 December 2025

फॅम तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'एक वही एक पेन' अभियान !


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर अनुयायी देणार आगळी वेगळी आदरांजली.


मुंबई : सालाबादप्रमाणे याही वर्षी फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटतर्फे ५ व ६ डिसेंबर, २०२५ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्पक पद्धतीने आदरांजली वाहिली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहायला आलेले भीम अनुयायी एक वही आणि एक पेन घेऊन येतात. जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातात  सातत्याने फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. 


येत्या ५ व ६  डिसेंबरला मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 'एक वही एक पेन' अभियान राबविले जाणार आहे. भीम अनुयायांनी आणलेले वही व पेन फॅम कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करावेत असे आवाहन संघटनेतर्फे केले गेले आहे. 


याही वर्षी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी हे अभियान राबविले जाणार  आहे. 


दुर्गम भागातील आदिवासी व वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना संकलित केलेले शैक्षणिक साहित्य दिले जाते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नागरिक प्रशंसा करत आहेत. 


फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम)


ठिकाण  : मुंबई

१) मीनाताई ठाकरे पुतळ्या शेजारी

२) स्टॉल क्रमांक ३१९ (छत्रपती शिवाजी महाराज पार्क)


संपर्क :

दीपक कांबळे - 9022641038

मधुकर कांबळे - 9833580370

मनसुख पवार - 9870326967

स्नेहल जाधव - 7738408752

संतोष कांबळे - 8108005422

दत्ता जावळे - 9702929356

सुशिम कांबळे - 8275043600

सुजित जाधव  - 99302 20581

No comments:

Post a Comment

Pages