पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेसाठी किनवटमध्ये भव्य मार्गदर्शन शिबीर
किनवट,ता.१० : नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन किनवट येथे महाराष्ट्र पोलीस भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन उद्या (ता.११)करण्यात आले आहे. या शिबिरात राज्यातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे विद्यार्थ्यांना यशस्वी तयारीबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
प्रा. कांगणे हे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी, परभणीचे संचालक असून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा, नियोजन, शारीरिक व लेखी परीक्षेची तयारी, तसेच यशासाठी आवश्यक शिस्त व आत्मविश्वास मिळण्यास मदत होणार आहे.हे मार्गदर्शन शिबीर रविवारी(ता.११) दुपारी २.०० वाजता आयोजित करण्यात आले असून स्थळ के. के. गार्डन, गोकुंदा (ता. किनवट) असे आहे. या उपक्रमासाठी पोलीस स्टेशन किनवटचे निरीक्षक गणेश कराड हे स्वागतोत्सुक आहेत.पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment