पहाटेच्या व्यायामादरम्यान दुर्दैवी अपघात ; अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 26 February 2026

पहाटेच्या व्यायामादरम्यान दुर्दैवी अपघात ; अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

 पहाटेच्या व्यायामादरम्यान दुर्दैवी अपघात ; 

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू



   किनवट : 

कोठारी तालुका किनवट येथील नंदाबाई गौतम पाईकराव (वय ५०) यांचा आज पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. त्या रोजच्या प्रमाणे सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडल्या होत्या. MIDC लगत असलेल्या महामार्गावर पेट्रोल पंपाजवळून जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र धडक इतकी जबर होती की त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.


या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पहाटे व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a Comment

Pages