बाळासाहेब आंबेडकरांचा नागपुरात ऐतिहासिक एल्गार! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 23 March 2026

बाळासाहेब आंबेडकरांचा नागपुरात ऐतिहासिक एल्गार!

बाळासाहेब  आंबेडकरांचा नागपुरात ऐतिहासिक एल्गार! 



नागपूर  २३ मार्च २०२६: वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांचा प्रचंड फौजफाटा आणि कडेकोट बंदोबस्त भेदून अखेर हा 'विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा' रेशीमबाग येथील RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मुख्यालयाच्या दिशेने धडकला.  कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत नागपूर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. संविधान चौकापासून ते संघ मुख्यालयापर्यंत ठिकठिकाणी बॅरिकेड्स आणि १,००० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

बाळासाहेबांचा इशारा : पोलिसांच्या विरोधानंतरही बाळासाहेब आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. "लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही," असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांसह कूच केले.


RSS ला विचारले जाब: हा मोर्चा प्रामुख्याने 'एपस्टीन फाइल्स' (Epstein Files) मधील कथित संदर्भांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काढण्यात आला होता. "संघ ही भाजपची मातृसंस्था असल्याने त्यांनी या प्रकरणावर देशाला स्पष्टीकरण द्यावे," अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसोबतच काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकापासून सुरू झाला आणि पोलीस अडथळ्यांनंतरही आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केले 

या आंदोलनामुळे नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता असून, संघ मुख्यालयाभोवती तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 


No comments:

Post a Comment

Pages