डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर.. श्रीमती तलवारे,अंबेकर,खेलबाडे,इंजी.शिंदे,डाॅ.काळबांडे,भगत,शाहीर बावलकर,जमधाडे आदी पुरस्काराचे मानकरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 22 March 2026

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर.. श्रीमती तलवारे,अंबेकर,खेलबाडे,इंजी.शिंदे,डाॅ.काळबांडे,भगत,शाहीर बावलकर,जमधाडे आदी पुरस्काराचे मानकरी

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर..

श्रीमती तलवारे,अंबेकर,खेलबाडे,इंजी.शिंदे,डाॅ.काळबांडे,भगत,शाहीर बावलकर,जमधाडे आदी पुरस्काराचे मानकरी



हिमायतनगर/नांदेड -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून श्रीमती कमलताई तलवारे, किरण अंबेकर,भारत खेलबाडे,इंजी.एस. के.शिंदे,डाॅ.अनिल काळबांडे,अमोल भगत आदी मान्यवर यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.त्यांना दि.२९ मार्च रोजी एक दिवशीय नवव्या बौद्ध धम्म परिषदेत सोनारी फाटा ता.हिमायतनगर येथे सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा,बौध्द धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांनी दिली.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,नांदेड च्यावतिने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यासाठी निवड समिती प्रमुख सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.प्रमोद अंबाळकर,डॉ.पि.बी.नामवाड, कैलास माने व त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या समितीने सन २०२५-२६ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत.

     सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलबाई विठ्ठलराव तलवारे,निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सहा.वनसंरक्षक भारत खेलबाडे,जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.शिंदे, मुळावाचे प्रा.डाॅ.अनिल काळबांडे, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत,वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील,सहा.गटविकास अधिकारी पि. एम.जाधव,प्राचार्य डि.डि.घोडके,जि.प. बांधकाम हदगांवचे उप अभियंता अशोक पवार,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता एस.एम. हिरप, वारंगटाकळीचे ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे,आदिलाबादचे गझलकार मधु बावलकर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम.सायलू म्हैसेकर,सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंद वाढे,शाहीर दिलीप कोसले,सरसमचे आदर्श मुख्याध्यापक गणेश कोकुलवार,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभू सावंत,भिमशाहिर बापूराव जमधाडे,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महागांव तालुकाध्यक्षा सौ.संध्याताई संदेश रणवीर या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे.

    दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने आयोजित एकदिवशीय नवव्या बौद्ध धम्म परिषदेत सोनारी फाटा येथे दि.२९ मार्च २०२६ रोजी धार्मिक,राजकीय,सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक तथा, बौद्ध धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर,स्वागताध्यक्ष तथा, हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिख शेठ,पुर्णाचे माजी नगराध्यक्ष प्रा.मोहन मोरे,निमंत्रक सुधाकर पाटील सोनारीकर,बालासाहेब पाटील टाकराळेकर,माजी सभापती जोगेंद्र नरवाडे,कैलास पाटील माने,बालाजी राठोड,आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे, अनिल मादसवार,डॉ.मनोज राऊत आदींनी दिली.


No comments:

Post a Comment

Pages