यशोदात अॅक्यूट पॅन्क्रियाटायटिस वर यशस्वी उपचार
३२ वर्षीय तरुण पवन उबेर यांच्यावर उपचार ः डॉ.दुर्गेश साताळकर व टिमचे सुयश
नांदेड – प्रतिनिधी
अॅक्यूट पॅन्क्रियाटायटिस आजाराने ग्रस्त वसमत येथील३२ वर्षीय तरुण पवन उबेर यांच्यावर वेळेत व अंत्यत नियोजित पद्धतीने यशस्वी उपचार करत त्यांना जिवनदान मिळवून देण्यात यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथील तज्ञ व अनुभवी डॉक्टर डॉ.दुर्गेश साताळकर व त्यांच्या टिमला मोठे यश मिळाले आहे
यासंदर्भात अधिक माहीती देतांना डॉ.दुर्गेश यांनी सांगितले की पॅन्क्रियाटायटिस ही अशी स्थिती आहे जी केवळ याचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीला पूर्णतः समजू शकते — ही एक अत्यंत वेदनादायक आणि असहनीय अवस्था आहे. ही केवळ एक गंभीर समस्या नाही तर अनेकांसाठी ही एक रहस्यासारखी आहे.
पॅन्क्रियाटायटिस म्हणजे काय?
पॅन्क्रियाटायटिस म्हणजे पॅन्क्रियास (अग्न्याशय) मध्ये होणारी जळजळ. हा एक लहान पण महत्त्वाचा अवयव आहे जो पोटाच्या मागील भागात स्थित आहे. पॅन्क्रियास कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि चरबी यांचे पचन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. वैद्यकीय भाषेत “-इटिस” म्हणजे जळजळ, म्हणूनच पॅन्क्रियाटायटिस म्हणजे पॅन्क्रियासची जळजळ होय. यामुळे तीव्र पोटदुखी निर्माण होऊ शकते, जी खूपच वेदनादायक असते.
अॅक्यूट पॅन्क्रियाटायटिस म्हणजे पॅन्क्रियासमध्ये अचानक उद्भवलेली जळजळ. यामध्ये आढळणारी लक्षणे:तीव्र पोटदुखी.उलटी आणि मळमळ.पोट फुगणे आणि अपचन.पाठीपर्यंत जाणारी वेदना अशा प्रकारचा त्रास होते पुढे ही समस्या तिव्र होऊन क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस मध्ये रुपांतर होत हा आजार जिवघेणा ठरतो मलामध्ये चरबी दिसणे.वजन कमी होणे आणि थकवा येणे अशी स्थिती निर्माण होते असे प्रतिपादन डॉ.दुर्गेश यांनी यावेळी केले
पॅन्क्रियाटायटिसची कारणे ः
· विषारी पदार्थ: अल्कोहोलचे अतिसेवन किंवा विषारी पदार्थ.
· अज्ञात कारण: कोणत्याही ज्ञात कारणाशिवाय होणारे.
· अनुवांशिकता: कुटुंबातील पिढीजात समस्या.
· ऑटोइम्यून: शरीराची प्रतिकारशक्ती पॅन्क्रियासवर हल्ला करते.
· पुनरावृत्ती किंवा अडथळा: गॉलब्लॅडरमध्ये खडे किंवा इतर अडथळे.
· अयोग्य आहारामुळे होणारे पोषणातील असमतोल.
पॅन्क्रियाटायटिसचे व्यवस्थापन व त्वरित उपाययोजना अत्यावश्यक
· अॅक्यूट पॅन्क्रियाटायटिसची लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
· दीर्घकालीन व्यवस्थापन
· अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा.
· पोषणयुक्त आहार घ्या.
· अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन आणि MRCP सारख्या आधुनिक निदान साधनांचा वापर करा.
यावेळी रुग्ण श्री पवन उबेर यांनी डॉ.दुर्गेश साताळकर, डॉ.मधूसूधन जाजू, डॉ.प्रसाद बाबू व यशोदा हॉस्पिटलच्या टिमचे आभार मानले
यशोदात उपचारांसाठी येथे करा संपर्क ः
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 किंवा किरण बंडे ९१५४१६७९९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे


No comments:
Post a Comment