किनवट येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 19 March 2026

किनवट येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा

 किनवट येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा


किनवट (प्रतिनिधी) : आशिष सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दि. 31 मे 2026 रोजी कलावती गार्डन, किनवट ता. किनवट जि. नांदेड येथे संपन्न होणार आहे.


या उपक्रमाचा उद्देश समाजातील सर्व घटकांतील गरजू कुटुंबांना आर्थिक दिलासा देत साध्या पद्धतीने विवाह सोहळे पार पाडणे हा आहे. सामूहिक विवाहामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसून सामाजिक एकात्मता वाढण्यास मदत होते.


आणि मा. व्यंकटराव नेम्मानीवार (संचालक सरस्वती विद्यामंदिर किनवट), मा. ऍड. मिलिंद सर्पे (अध्यक्ष: सेक्युलर मोमेन्ट नांदेड), मा. डॉ. आनंद भालेराव (प्रा. संत भगवान बाबा कला व विज्ञान महा. बोधडी) आणि मा. ऍड. सुनील येरेकार (कायदेशीर सल्लागार) यांचे या मेळाव्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे.


मेळाव्यासाठी नोंदणी सुरू असून इच्छुक वधू-वरांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विविध पदाधिकाऱ्यांची समिती कार्यरत असून अध्यक्ष म्हणून अजय कदम, उपाध्यक्ष वसंत राठोड, सचिव मारोती गायकवाड, कार्याध्यक्ष लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, सहसचिव अतुल दर्शनवाड, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत दराडे, संघटक प्रशांत कोरडे, सहसंघटक गौतम धावारे, डी. के. उमरेकर, प्रसिद्धी प्रमुख राजू गायकवाड, आकाश आळणे, सदस्य संतोष गुरनुले, कपिल कांबळे, प्रमोद मुनेश्वर, राहुल चिखलीकर, राजकुमार सूर्यवंशी, राजू कापुरे, बाळासाहेब कावळे, विजय कदम, नारायण सिंगर व नवीन जाधव यांच्यासह अनेक सदस्य परिश्रम घेत आहेत.

      संयोजन समिती तर्फे विवाह सोहळा  पार पाडण्यासाठी किनवट शहरातील प्रशस्त अशी कलावती गार्डन मंगल कार्यालयाचे नियोजन केले असून वधू वराना कपडे, चप्पल मणी मंगळसूत्र आणि जेवणाची सरोत्तम सोय करण्यात आलेली आहे अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना आयोजक राजेंद्र शेळके यांनी सांगितले तरी सदरील सामाजिक उपक्रम राबविण्याचा उद्देश हा सर्व समाजातील तळागाळाच्या घटकापर्यंत हा संदेश पोहोचवून गरजू व्यक्तींना आई वडिलांना हा संदेश पोहचवून लग्नारा लागणाऱ्या अवाढव्य खर्चासाठी कर्जबाजारी किंवा आपली शेती विकून घरदार विकून लग्न लावण्याची गरज नसून आमच्या विवाह मेळाव्यात केवळ नोंदणी करून सर्व जबाबदारी मुक्त व्हावे, एखाद्या धनाढ्य माणसाला लाजवेल अशा पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडण्यात येईल असे मत राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संयोजक दिपकदादा ओंकार तर आयोजक राजेंद्र शेळके असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमास जास्तीत जास्त लग्न नोंदणी करून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


नोंदणी साठी संपर्क ( राजेंद्र शेळके 8806088105, दीपकदादा ओंकार 9850776670, अजय कदम 9403155736, वसंत राठोड 9767287088, लक्ष्मीपती दोनपेल्लीवर 9850487694)



No comments:

Post a Comment

Pages